नुकसान भरपाईची मागणी
गुढे.ता.भडगांव (प्रतिनिधी)-गेल्या पंधरवड्यापासून गांव परिसरात जोरदार पाऊस पडत असून गिरणा नदीबरोबर परिसरात छोटे मोठे नदी नाले,ओढयांना पूर आले आहेत.येथील लवण नाल्याच्या पुराच्या पाण्यात येथील शेतकरी राजेंद्र सतन पाटील यांची म्हशीचा पाण्यात बुडून मेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांने केली आहे.
परिसरात आठवडा भरापासून जोरदारपणे पाऊस पडत असल्याने गिरणा नदीला व लवण,कोरडी नाल्यांना देखील मोठी पूर परिस्थिती मुळे येथील लवण शिवारातील शेतकरी राजेंद्र सतन पाटील यांना शेतातून म्हैस घरी आणणे शक्य नसल्याने त्यांनी शेतात म्हैस बांधून ठेवली होती शनिवारी रात्री म्हशीने दोर तोडून शेतातून घराकडे निघाल्याने ती रस्त्यावरील लवण नाल्याच्या फरशीला आलेल्या पुरात वरून वाहून गेल्याने ती दिवसानंतर गिरणा थडीत झाडांमध्ये अडकून जाऊन तेथे मेल्या अवस्थेत सापडली या म्हशींचा रितसर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मेहेर व कर्मचारी संजय पाटील यांनी जागेवर पाहणी करून शवविच्छेदन केले व तलाठी डोळे व कर्मचारी विजय पाटील यांना रितसर बाजरभाव प्रमाणे एक लाख तीस हजारांचा पंचनामा केला यावेळी पंच म्हणून भुपेंद्र पाटील,राहुल पाटील उपस्थित होते या गरिब शेतकऱ्यांचे म्हैस मेल्याने मोठे नुकसान झाले आहे म्हणून शासनाने पूरात वाहून मेलेल्या म्हशीला नुकसान भरपाईची मागणी केली आहे.







