जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महनीयरिक्षकांच्या पथकाने काल केलेल्या कारवाईत नाशिक जिल्ह्यातील देवळा ते मालेगाव मार्गावर ४५ लाखांचा गुटखा जप्त केला . आरोपी वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे .
काल विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील पो नि बापू रोहम, स पो नि सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशिर तडवी, हे कॉ सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, पो ना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, सुरेश टोगांरे यांनी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळा ते मालेगाव मार्गावर एम एच 15 जी व्ही 7623 क्रमांकाच्या आयसर मालवाहू गाडीतून नेली जात असलेली विमल गुटखाने भरलेली 113 पोती जप्त केली या गुटख्याची किंमत 45 लाख 26 हजार 315 रुपये असून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत 12 लाख रुपये आहे. आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईलही जप्त करण्यात आला.
आरोपी चालक अतुल अशोक शिंदे ( रा.नाशिक ) याला अटक करण्यात आली आहे . गोडाऊन मालक वाजदा (गुजराथ) , खरेदी करणारे राजु कोठावदे ( रा.मालेगाव ) , सुनिल अमृतकर ( रा.नाशिक ) , माँन्टी ( रा.नाशिक ) हे ४ आरोपी मात्र फरार आहेत . या आरोपींच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भादवि कलम .272,273, 328,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .