जळगाव (प्रतिनिधी) -पिंप्राळा परिसरात अवैध गुटखा आणि पानमसाल्याची विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, पिंप्राळा येथील सेंट्रल बँक परिसरात बेकायदेशीररित्या गुटखा आणि पानमसाल्याची साठवणूक करून विक्री होत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता छापा टाकून सुमारे ११ हजार ५५0 रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक प्रवीण वसंत जगदाळे यांच्या फिर्यादीवरून हरीश सुभाष सोमानी व जितेंद्र बापूराव वाणी (दोन्ही रा. सेंट्रल बँक कॉलनी जळगाव) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास महाजन करीत आहे.