सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथील घटना
सोयगाव (प्रतिनिधी) :- बोरमाळ तांडा ता. सोयगाव येथे शेळ्या चारताना वीज पडल्याने १६ वर्षीय तरुणासह आठ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दिनांक २१ रोजी सकाळी घडली. या प्रकरणी बनोटी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
बोरमाळ तांडा येथील अजय नथ्थु राठोड (वय १६) हा मयत झाला आहे. अजय राठोडच्या पश्चात आजी, आई, वडील, एक भाऊ आहे. (केसीएन)सकाळी १० वाजता नेहमी प्रमाणे तो बकऱ्या घेऊन जंगली कोठा शिवारात चारण्यासाठी घेऊन गेला. बकऱ्या चारत असतांना अचानक वीज कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर आठ शेळ्याही वीजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडल्या. शिवारातील मजुर यांनी धावत जाऊन बघितले असता हा प्रकार लक्षात आला.
मृत अल्पवयीन मुलालां बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता आरोग्य अधिकारी यांनी तपासून मृत केले. (केसीएन)त्याच्यावर बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बनोटी दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन अजय घरातील कर्ते असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.