जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील घटना
अजय दीपक पाटील (२१, रा. डोमगाव, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.(केसीएन) दीपक हा एका कंपनीत कामाला होता तर त्याचा लहान भाऊदेखील पुणे येथे कंपनीत नोकरीला आहे. तालुक्यातील डोमगाव येथील शेतकरी दीपक पाटील यांच्या मालकीच्या गुरांचा गावाजवळच गोठा आहे. त्या ठिकाणी अजय हा गेलेला होता. त्या वेळी तेथेच गळफास घेतला.
गावातील काही जणांना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला व ही माहिती त्याच्या घरी दिली. त्या वेळी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे डोमगाव येथे शोककळा पसरली आहे.