जळगाव ( प्रतिनिधी ) – माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यासह त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी काल रिपाइं ( आठवले गट ) कार्यकर्त्यांनी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिले .
दीपक गुप्ता यांच्यावर राज्यभरात विविध गुन्हे दाखल आहेत . स्थानिक गुन्हयाच्या पार्शवभूमीवर त्यांना पुरविण्यात येत असलेले पोलीस संरक्षण काढून घ्यावे व त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या पार्शवभूमीवर जिह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार करावे दीपककुमार गुप्ता बेकायदेशीरपणे राहत असलेल्या महानगरपालिकेच्या शिवाजीनगर हुडको येथील सदनिका खाली करून घेत त्यांच्यावर मनपा अधिनियमनुसार कारवाई व्हावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत .
विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांना हे निवेदन देताना मिलिंद सोनवणे , भिमराव सोनवणे , प्रताप बनसोडे , भरत मोरेश्वर , आकाश पाटील आदी उपस्थित होते.