वार्षिक तपासणी कार्यक्रमात अनेक अधिकाऱ्यांचाही गौरव
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीसदलाच्या वार्षिक तपासणीकामी नाशिक पोलीस परिक्षेत्राचे महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या हस्ते जळगाव एलसीबीचा गौरव करण्यात आला. गुंतागुंतींच्या प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.
नाशिक पोलीस परिक्षेत्राचे महानिरीक्षक बी.जी.शेखर हे वार्षिक तपासणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. रविवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर परेडचे आयोजन करण्यात आले होते. परेडनंतर उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगाव एलसीबी टीमचा पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, अमोल देवढे, पोलीस हवालदार संदीप साबळे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील, पोलीस नाईक प्रीतमकुमार पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, सहाय्यक फौजदार अनिल जाधव यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा देखील गौरव करण्यात आला.