जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील तामसवाडी गाव व परिसरातील गुन्हेगार हेमंत उर्फ नाटया मच्छिंद्र पवार यास कोल्हापूर कारागृह येथे स्थानबद्ध करण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी, जळगाव यांनी आदेश दिल्याने मच्छिंद्र उर्फ नाटया हेमंत पवार यास मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे पोहचविण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक ते प्रो डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.