जिल्ह्यात विविध ठिकाणी दाखल आहेत गुन्हे
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे दोन तरुण गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चौकशीअंती दोघांना जळगाव जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे.
शनिपेठ पोलीस कडील हद्दपार प्रस्तावप्रमाणे आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय २३, टोळीप्रमुख व गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे (वय २०- टोळी सदस्य, रा. कांचननगर, जळगाव) यांचे विरुध्द शनिपेठ पो.स्टे. जिल्हा पेठ, जळगांव शहर पो.स्टे, जळगांव तालुका पो स्टे. एरंडोल पोलीस स्टेशनला खून, खुनाचा प्रयत्न दरोडा, जबरी चोरी, चोरी, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, मारामारी आदी एकूण १३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. हद्दपार प्रस्तावाची चौकशी संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेली आहे.
सदरचा हद्दपार प्रस्ताव हा शनिपेठचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, सफौ संजय शेलार, पोहे/अश्वीन हडपे, परिष जाधव, पोकों/ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, किरण वानखेडे अशांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता. पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती आकाश सपकाळे व गणेश सोनवणे यांना ०२ वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. निरी किसन नजनपाटील यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेका/सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.