रावेर पोलीस स्टेशनचे कामगिरी
रावेर ( प्रतिनिधी ) : – येथील शेळी चोरीस गेलेल्या घटनेचा गुन्हे शोध पथकाने तपास लावून दोन चोरांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १३ हजार रुपये किमतीच्या शेळ्या पोलीसांनि हस्तगत केल्या आहेत.
रावेर येथील गांधी चौकातील रहिवासी फिरोजखान अकबरखान यांच्या दोन शेळ्या दि. १२ रोजी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या होत्या. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला तपासासंदर्भात सूचना दिल्या. गुन्हे शोध गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून चोरट्यांची ओळखण्यात पटविण्यात यश मिळवले.
जितेन मदन सोळंकी (वय १९, रा. रसलपूर), राजू मोहन भिलाला (वय २१, रा. केहऱ्हाळा) यांना चोरी प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३ हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भूषण सपकाळे, उषा मदाने यांनी केली. पुढील तपास पोहेकाँ हमीद तडवी हे करीत आहेत.