चाळीसगाव पोलिसांत दाखल होता चोरीचा गुन्हा
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील तहसील कार्यालयासमोरून दि. २० रोजी दुचाकी चोरीस गेली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी अवघ्या ३ तासातच दुचाकीसह चोरट्यास खडकी बायपास येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सागर अजितराव देशमुख (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) यांची ४० हजार रुपये किमतीची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमाक एमएच १९ बीए ६४ ही दि २० डिसेंबर रोजी तहसील कार्यालय समोरून दुपारी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्यांनी २ दिवस तपास केल्यावर दि. २२ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एक संशयित इसम हिरापूरकडून चाळीसगावकडे विना नंबरच्या मोटारसायकलवर येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला ताब्यात घेतले.
चेतन संतोष पाटील ( वय २८, रा. शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. तहसील कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक भूषण पाटील तपास करीत आहेत.