जिल्हा पोलीस दलातर्फे जनता दरबारचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या दि. २६ रोजी सकाळी १० ते १ दरम्यान मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंड जवळ येथे जळगांव उपविभागातर्फे “तक्रार निवारण दिन (जनता दरबार)” चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर जनता दरबार दिनाचे दिवशी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, तसेच जळगांव उपविभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी. दुय्यम अधिकारी व अंमलदार हे उपस्थित राहणार आहे. तरी जळगांव उपविभागातील (जळगांव शहर, शनीपेठ, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगांव तालुका, रामानंदनगर) पोलीस स्टेशन हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील राहणारे नागरिकांना कळविण्यात येते की, त्यांनी आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच तक्रारीचे अडीअडचणी असल्यास दि. २६ रोजी सकाळी १० उपस्थिती द्यावी, आवाहन पोलीस दलाने केले आहे.