वावडदा ( प्रतिनिधी ) – येथील सरपंच राजेश वाडेकर यांनी स्वखर्चाने ग्रामस्थ व परिसरातील रुग्णासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या आणि दहा लाख रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवशी विशाल देवकर यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मजूर फेडरेशनचे चेअरमन लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चौधरी , अजय सोनावणे, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, कानळदा येथील सरपंच पुडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण, पाथरीचे निलेश पाटील, संभाजी पाटील ( वडली ) , मधुकर पाटील ( म्हसावद ), ईश्वर पाटील ( वाकडी ) , समाधान निकुंभ ( दापोरा ) , अरुण पवार ( सरपंच विटनेर ) , नितीन जैन, बाबू पिंजारी, समाधान सपकाळे यांचेसह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.