जळगाव ( प्रतिनिधी ) – गुजरात पोलिसांना १० गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आणि जळगाव जिल्ह्यात लपून बसलेला आरोपी आज स्थानिक गुन्हे शाखेने सापाला रचना पकडला आणि त्याला सुरत पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या ताब्यात देण्यात आले .
सुरत पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने हा कैलास आधार पाटील ( रा – महादेव नगर सोसायटी , नगम , डिंडोली , सुरत ) नावाचा आरोपी जळगाव जिल्ह्यात लपून बसला आहे , अशी त्यांना मिळालेली माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना कळवली होती . गुजरात मधील डिंडोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती . जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन , हे कॉ संदीप पाटील , पो ना प्रवीण मांडोळे , भगवान पाटील , नंदलाल पाटील , सचिन महाजन , ईश्वर पाटील यांच्या पथकाने या आरोपीचा शोध घेत माहिती मिळवली होती .
हा आरोपी रात्री अमळनेर येथे त्याच्या प्रेयसीला भेटण्याकरीता जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावर पथकातील कर्मचारी व स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत यांनी संयुक्त सापळा मंगरुळ – पारोळा रोडबर रचुन आरोपोस जेरेबंद केले पुढील कारवाईसाठी आरोपीस गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या आरोपीच्या विरोधात गुजरातमधील माहीम पोलीस ठाण्यात १ , लिम्बायत पोलीस ठाण्यात ६ , सचिन पोलीस ठाण्यात २ आणि डिंडोली पोलीस ठाण्यात १ असे १० गुन्हे दाखल आहेत.