जळगाव (प्रतिनिधी)- पारोळा तहसीलदार कार्यालय येथे आज शुक्रवार दि.5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र ग्रंथालय सेना यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांना covid-19 च्या काळात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीच्या पगार देण्याकरिता वर्ष 2020 ते 2021 (वेतनेवर) ग्रंथ खरेदी खर्च करण्यास विशेष बाब म्हणून शासनाने निधी मंजूर करून द्यावा याबाबत तहसीलदार, पारोळा यांच्यामार्फत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले देण्यात आले.
यावेळी निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेना पारोळा तालुका यांच्यावतीने तहसीलदार यांना ग्रंथालयाचे विविध मागण्यांचे निवेदन देताना डॉ. प्रशांत पाटील जळगाव जिल्हाप्रमुख, सतीश पाटील तालुकाप्रमुख, किशोर पाटील तालुकाउपप्रमुख, प्रा. जगदीश भागवत कायाध्यक्ष , चारुदत्त मोरे, संकेत मोरे, हितेश वाघ, रामकृष्ण पाटील इत्यादी.