शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ४५ जणांची पहिली यादी जाहीर
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आज गुरुवारी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे म्हणाले. इस्लामपूरमधून स्वतः जयंत पाटील रिंगणात असतील. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर, जामनेर मतदारसंघातून दिलीप खोडपे तर मुक्ताईनगर येथून रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख, घनसावंगीमधून राजेश टोपे रिंगणात असतील. कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांना, बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ४५ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार*
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
नारायण पाटील -करमाळा
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर