मुंबई ( प्रतिनिधी ) – श्री.साई मल्टिसर्व्हिसेस प्रकाशीत मासिक ‘ग्रामगौरव’ च्या पहिल्या अंकाचे विमोचन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंत्रालयासमोरील बंगल्यावर आज पार पडले.
ग्रामविकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र भरारी घेत आहे. महाविकास आघाडी सरकार लोकाभिमुख योजना राबवत असतांना लोकसहभाग वाढावा म्हणून ग्रामगौरव मासिक हे शासन आणि जनतेचा दुवा ठरावे, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. यावेळी ना.मुश्रीफ यांनी जळगावसारख्या ठिकाणाहून राज्याच्या प्रत्येक गावाला विकासाची दिशा देणारे ‘ग्रामगौरव’ हे उपयुक्त प्रकाशन असल्याचे नमूद करत प्रकाशनाच्या सर्व चमुचे कौतुक केले.
मासिकाच्या एडिटर ईन चिफ कु.धनश्री ठाकरे यांनी ना.मुश्रीफ यांचे स्वागत केले. कु.ठाकरे यांनी १२ जानेवरी रोजीच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रणेत्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच युवा संकल्प दिनानिमित्त मासिक ग्रामगौरवचा अंक प्रकाशित होत असल्याचा आंनद असल्याचे प्रास्ताविकात नमूद केले.ग्रामगौरवचे संपादकीय धोरण तसेच मासिक निर्मिती मागील भूमिका समूह संपादक विवेक ठाकरे यांनी स्पष्ट केली.
अंकाच्या प्रकाशनानंतर अनौपचारिक चर्चेत मासिकात ग्रामविकास विभागाच्या कामांचा व योजनेचा आढावा मांडणाऱ्या ‘सत्ता विकेंद्रीकरणावर भर’ या कव्हर स्टोरीत मानद संपादक अमोल मचाले यांनी सर्व मुद्दे समाविष्ट केल्याबद्दल मंत्री ना.मुश्रीफ यांनी आंनद व्यक्त केला
या वेळी नगरचे आ.संग्राम जगताप यांची विशेष उपस्थिती होती. लोकप्रशासन डिजिटल मीडियाचे संचालक व जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे मंत्रालय प्रतिनिधी आर्यन आखाडे यांच्यासह जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे मॅनेजर (ऑपरेशन) शरद चौधरी व राजू भडके यांनी परिश्रम घेतले. वाणिज्य संपादक विशाल घोडेस्वार यांनी आभार मानले.