जळगाव (प्रतिनिधी) :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र, एकमेव नोंदणीकृत ग्राहक संरक्षण संस्थांची जळगाव ता. कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली. स्स्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे हे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
तर गिरधर डाबी सचिव, अंतिम पटणी संघटक, शरद सोनवणे कोषाध्यक्ष तर रामचंद्र जोशी, मनिषा पाटील, महेश चावला, देवेंद्र पटणी, डॉ गौरव महाजन, डॉ किरण नाईक हे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन तहसिलदार,आय ए एस अर्पित चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत सदस्य, सरकारी कार्यालय, जसे वैदयमापन, दुध संस्था, गॅस वितरक, रेशन दुकानदार, कृषि खाते अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. तहसिलदार अर्पित चव्हाण, डॉ. धांडे, अॅड मुंदडा, कोतवाल, मोरखडे, मोहरीर,चावला यांनी मार्गदर्शन केले. सरकारने ग्राहक संरक्षण कायदे अंतर्गत ग्राहकांना जे अधिकार देण्यात आलेले आहे त्याचा ग्राहकाने उपयोग करावा, जागरूक राहावे,ग्राहक संघटीत व्हावा, या दृष्टीने काय उपाय योजना करता येतील यावर मार्गदर्शन केले. जाधव यांचा उकृष्ट साधक म्हणून तहसिलदार चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.