जळगाव ( प्रतिनिधी ) – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जळगाव जिल्हा परिषदमधील रिक्त जागांची भरती 2019 पासून झालेली नाही. ही भरती न झाल्यास 4 ऑक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत उपोषण करतील असा इशारा ग्रा पं कर्मचारी महासंघ आयटकतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 10 टक्के आरक्षणाच्या 100 च्यावर जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेने त्वरित भरती करावी. 2021 च्या सेवाजेष्ठता यादीत ज्यांचे नाव आहे त्यांचा विचार व्हावा वर्ग-3 व वर्ग-4 साठी सरकारने ठरवलेली मूळ शिक्षण पात्रता नुसार भरती व्हावी ही भरती पारदर्शी व्हावी कोबिड महामारीमुळे भरती रखडली त्यामुळे सेवाज्येषठता यादीतील 45 वर्षे वयाच्या कर्मचाऱ्यांना 1वर्षे यादीत ठेवण्याची संधी द्यावी. महात्मा गांधी जयंतीपर्यंत भरतीची कार्यवाही न झाल्यास 4ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करतील असा ईशारा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सहसचिव अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखालील संदीप देवरे ,शिवशंकर महाजन, राजेंद्र कोळी , रमेश पाटील , अनंता कराळे , गणेश सुरवाडे , लक्ष्मण बिऱ्हाडे , रवींद्र पाटील , सतीश परदेशी, भगवान पाटील , प्रमोद शेळके , प्रकाश कोळी , अतुल बऱ्हाटे यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . हे निवेदन जिल्हा परिषदचे ग्राम पंचायत विभागाचे कक्ष अधिकारी वाय. डी. मराठे यांना देण्यात आले.