कासोदा पोलिसांची यशस्वी कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- जीपीएस सिस्टीमच्या आधारे ट्रॅक्टर चोरी रोखण्यात एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलिसांना यश आले आहे. सदर ट्रॅक्टर चोराला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील ताडे येथील शेतकरी अनिल लोटन पाटील यांचे मालकीचे लाल-पांढऱ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर नं. एम एच १९ बीजी ८०९१ व त्यास लावलेले रोटेव्हिटरसह चोरी झाल्याबद्दल १८ नोव्हेंबर रोजी कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ट्रॅक्टर मालक अनिल पाटील यांनी ट्रॅक्टरला जीपीएस सिस्टीम लावलेली होती. त्यानुसार सध्या त्यांचे ट्रॅक्टर कुठे आहे हे जीपीएस लोकेशन मुळे कळून येत होते.
त्यांना सोमवारी ट्रॅक्टर हे सिल्लोड येथे जात असल्याचे जीपीएस वरून समजले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार कासोदा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी त्यांचे पथक लागलीच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड येथे पाठवले. सिल्लोड पोलिसांच्या मदतीने कासोदा पोलिसांनी सदर ट्रॅक्टरसह संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे
प्रविण भाईदास कोळी (वय २४, रा. विखरण ता. एरंडोल) असे संस्थेत आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या दोन साथीदारांसह हे चोरीच्या कृत्य केल्याचे तपासात दिसून आले आहे. कासोदा पोलीस स्टेशन येथील पो.हे.कॉ. नंदकुमार पाटील, पो.कॉ. इम्रान पठाण, चालक स. फौ. मनोज पाटील अशांनी ही कामगिरी केली.