जळगाव ( प्रतिनिधी ) – राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणी सेना यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार खडका ( ता.भुसावल) येथील रहिवाशी, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय शाळेतील शिक्षक व राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव भोळे यांना देण्यात आला.
त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला त्यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी विविध सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.