जामनेर ( प्रतिनिधी ) – गोंदेगाव (शेंदुर्णी) येथे विधी सेवा प्राधिकरण , तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती शिबिर ॲड. ज्ञानेश्वर बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
ॲड.एस आर पाटील यांनी पायाभूत कायद्याबद्दल व ॲड अर्चना किरोते यांनी महिलाविषयी कायद्याची माहिती दिली, डॉ. सौ. भक्ती कुलकर्णी यांनी ॲसिड अटॅकमधील पीडित महिला व त्यांचे अधिकार याविषयी माहिती, डॉ. विजयानंद कुलकर्णी यांनी स्री पुरुष समानता याविषयी मार्गदर्शन केले, ॲड. ज्ञानेश्वर बोरसे आणि ॲड आशुतोष चंदेले यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला
याप्रसंगी ॲड. दिपाली सुरवाडे, ॲड देवेंद्र जाधव, ॲड प्रसन्न फासे , सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, तेजस्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले
दोंडवडे येथे एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, तेजस्विनी पाटील, पूजा सांखला, संकेत राजपूत, सचिन पाटील गोविंदा जाधव यांनी रॅली काढत जनजागृती केली सरपंच आणि ग्रामसेवक समवेत ग्रामस्थ मंडळी यांनी रॅलीत सहभाग नोंदविला ॲड कोमल काळे यांनी विधी सेवा प्राधिकरणविषयी तर ॲड आशुतोष चंदेले यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा याविषयी मार्गदर्शन केले,