एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : गौहत्या करून मांस खरेदी विक्री तसेच कब्जात बाळगणा-यांना जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.
युसुफ खान समशेर खान (रिक्षा चालक), शेख शकील शेख चांद आणि आसिफ खान लतीफ खान अशी पोलिसांच्या ताब्यातील व छापा कारवाई करण्यात आलेल्या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना किशोर पाटील, पोशि गणेश ठाकरे, छगन तायडे, किरण पाटील, योगेश घुगे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास ग्रेड पो.उप.निरी. संजय पाटील व पो.कॉ नरेंद्र मोरे करत आहे.