पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील आसोदा येथे मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींमध्ये पूर्व वैमनस्यातून वाद होऊन यातील हद्दपार असलेल्या तरुणाने हवेत गोळ्या झाडल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस याबाबत माहिती घेत असून घटनास्थळी अधिकाऱ्यांचा ताफा पोहोचला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे असोदयामध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एक हद्दपार असलेला तरुण गुन्हेगार त्याच्या मित्रांसोबत रात्री आसोदा येथे आला होता. जुन्या वादाच्या कारणावरून असोदा येथील एका तरुणाशि त्याचा वाद झाला. आसोदा येथील हॉटेल आर्याजवळ झालेल्या या वादानंतर गुन्हेगाराने हवेमध्ये बंदुकीने तीन फेरी झाडल्या असल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार झाल्यामुळे एकच खळबळ असोद्यामध्ये उडाली आहे.
घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींचा तपास करीत आहे.