पहा सोन्या चांदीचे आजचे दर
जळगाव (प्रतिनिधी ) ;-जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोन्याचे दर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले असून चांदीची चकाकी कायम असल्याचे दिसून आले.
जळगावच्या सराफा बाजारात आज ४०३ रुपयांनी स्वस्त झाले. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०३९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा दर ७०,७९३ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव बुधवारच्या ८०९२१ रुपये प्रति किलोच्या बंद दराच्या तुलनेत आज ८०५९८ रुपये प्रति किलोवर खुला झाला.
२३ कॅरेट सोन्याच्या आयबीजेएच्या दराबद्दल बोलायचं झाले तर आज ते ४०२ रुपयांनी स्वस्त होऊन ७०१०८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३६९ रुपयांची घसरण झाली आणि आज तो ६४४७७ रुपये प्रति १० ग्रॅम दराने उघडला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३२५ रुपयांनी कमी होऊन ४२७९३ रुपये झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव २३६ रुपयांनी कमी होऊन ४११७८ रुपये झाला आहे.
विशेष म्हणजे सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.