जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गजबजलेले रस्ते आणि गर्दीचा फायदा घेणारे वाहनचोर दिवसेंदिवस पोलिसांना वरचढ ठरत आहेत . मंगळवारी पुन्हा गोलाणी मार्केटसमोरून मोटारसायकलची चोरी झाल्याने चोरांची वाढलेली हिंमत दिसून आली
सुप्रीम कॉलोनीतील रहिवाशी व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करणारे जितेंद्र लक्ष्मण निकुंभ मंगळवारी कामासाठी गोलाणी मार्केटमध्ये गेले तेंव्हा त्यांनी त्यांची एम एच -१९- बी एल – ३६४८ क्रमांकाची हिरो होंडा मोटारसायकल सातपुडा पेपर एजंसीसमोर उभी केली होती त्या दिवशी सायंकाळी ४ ते ५. ३० वाजेदरमायन त्यांची ही ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आज जितेंद्र निकुंभ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.