जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गोलाणी मार्केट येथील दत्त मंदिराजवळ एका तरुणाची २५ हजार रुपये किमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी ८ मे रोजी सायंकाळी सात वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी ९ मे रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, आशिफ भिकन शेख वय-३३, रा. उस्मानिया पार्क शिवाजीनगर जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. बुधवारी ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आसिफ शेख हा त्याच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९, डीजे ७८६३) जळगाव शहरातील गोलांनी मार्केट येथे आलेला होता. त्यावेळी त्यांनी गोलाणी मार्केट मधील दत्त मंदिराजवळ त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर अशीफ शेख यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी ९ मे रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील पाटील हे करीत आहे.