जळगाव ;- शहरातील गोलाणी मार्केटमधून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
धनंजय निकम जुना मेहरूण रोड जळगाव, हा २ जून रोजी दुपारी १२ वाजता दुचाकी (एमएच १९ बीके ३९१५) ने शहरातील गोलाणी मार्केट परिसरात पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती मात्र यानंतर ती दिसून न आल्याने धनंजय निकम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तपास भास्कर ठाकरे करीत आहे.







