जळगाव ;- योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ मनःप्रशमनोपायो योग इत्यभिधीयते॥ अर्थात हे अर्जुना, योगात राहून आसक्ती सोडून तू कर्म कर.पूर्णता आणि अपूर्णता समान असणे याला योग म्हणतात.मन मोकळे करण्याचे साधन म्हणजे योग. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्याक्षिकांचे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी या थीम अंतर्गत योगा डे चे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या योगा हॉलमध्ये सकाळी ९ वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकीचे अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे व रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव तसेच योगशिक्षक प्रा. महेश एन पाटील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थीत होते. योग प्रात्याक्षिकासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.महेश एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकवृंद यांनी योग प्रात्याक्षिक केले.
यात त्यांनी सूर्यनमस्काराचे फायदे व प्रात्यक्षिक करून दाखवले. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, बद्धकोणासन, व्रजासन, मंडुकासन तसेच प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी हे प्राणायाम करुन घेतले. आजच्या आधुनिक युगात व्यग्रतेमध्येही योगासने *शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. सर्व शारिरीक व मानसिक आजारांना शरिरासोबत दुर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो.
रोज योगासने केल्याने शारिरीक आणि मानसिक उर्जेच्या विकासासोबतच तणाव आणि नैराश्यही कमी होते, असेही त्यांनी सांगितले. उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील यांनी कौतुक केले