जळगाव ;- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेले प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच 4 व 5 फेब्रुवारी रोजी इंडक्शन कार्यशाळा (प्रेरण कार्यक्रम) गुगलमीटवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
सर्वप्रथम बेसिक इंजिनिअरींग सायन्सेस ॲण्ड ह्युमॅनिटीज विभागाचे प्रमुख डॉ.नितीन भोळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रा.शफिक अन्सारी यांनी संपूर्ण संस्थेची कार्यपद्धती, संस्थेची संपूर्ण माहिती, वेगवेगळे विभाग व त्यांचे प्रमुख यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. दुसऱ्या सत्रात प्रा.निलेश चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाच्या नविन अभ्यासक्रमाबाबत तसेच परिक्षा पॅटर्न, विद्यापीठाचे नियम या बद्दल सविस्तर माहिती दिली. सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे शंकाचे निरसन करण्यात आले. संस्थेचे अकॅडमीक डीन प्रा.हेमंत इंगळे यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग तसेच गर्व्हमेंट इंजिनिअरींग सर्विसेस मधील संधी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, परदेशातील संधी याबाबत मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ.विजय एच पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थीत सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करुन दिली तसेच मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्यादिवशी महाविद्यालयाचे ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.विजयकुमार वानखेडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या सत्रात MESA, CESA, EESA, TESA या स्टुडंट कौन्सीलच्या प्रेसींडेन्ट यांनी त्यांच्या कौन्सिलच्या माध्यमातून महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या तसेच आगामी आयोजित उपक्रमांबद्दल माहिती दिली. तृतीय सत्रात क्रिडा संचालक प्रा.आसिफ खान यांनी क्रिडा विषयात असलेल्या सुविधांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय एच पाटील, उपप्राचार्य प्रा.प्रविण फालक, विभागप्रमुख डॉ.नितीन भोळे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.जुनेरिया शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रथम वर्ष विभागाचे डॉ.सरोज भोळे, प्रा.ललिता पाटील, प्रा.ममता पाटील, प्रा.संजय चौधरी यांनी सहकार्य केले.







