जळगाव(प्रतिनिधी) :- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात आषाढी एकादशीनिमीत्त वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी इशांन्वी आशिष भिरूड यांचेसह बालगोपालांनी विठ्ठल रखुमाई तसेच विविध संताची वेशभूषा केली.या वेळी आशिष भिरूड व मंजूषा भिरूड यांच्या हस्ते पालखीचे पूजन व विठठूलल्लाची आरती करण्यात आली. या नंतर बालगोपालांनी दिंडी व रिंगण सोहळा पार पाडला. ऑनलाईनच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी बालगोपालांचे कौतुक करीत शुभेच्छा व्यक्त केल्यात.
गोदावरी इग्लीश मिडीयम स्कुल
येथे गोदावरी इग्लीश मिडीयम सीबीएसई स्कुलमध्ये देखिल आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई तसेच विविध संताची वेशभूषा केली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा चौधरी यांच्या हस्ते पालखीचे पूजन व विठठूलाची आरती करण्यात आली. त्या नंतर विद्यार्थ्यांची दिंडी व रिंगण सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद पालक शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग यांचे सहकार्य लाभले.