फे्रशर्स पार्टी, क्रीडा स्पर्धा रंगल्या ; कलाप्रकाराचे सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) – येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक २०२६ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या सप्ताहात फ्रेशर्स पार्टी, क्रीडा स्पर्धा आणि विविध कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात साम्राज्य बॅचतर्फे एसएनए विकचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रेमचंद पाटील, प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. जयवंत नागुलकर, प्राचार्या विशाखा गणवीर, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एएनएम, जीएनएम आणि बी.एससी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी फ्रेशो स्पार्कचे आयोजन करण्यात आले होते. यात रॅम्प वॉक, इंडियन कल्चर, बार्बी एनकेन, हॉलीवुड, महाराष्ट्रीयन संस्कृती, गीत गायन, नृत्य, नाटिका असे विविध कलाप्रकरांचे सादरीकरण करण्यात आले. फ्रेशो स्पार्कमध्ये आयुष मोरे हा मिस्टर फ्रेशर्स आणि हर्षिता राजपूत ही मिस फ्रेशर्स म्हणून निवडण्यात आली. तसेच मिस्टर आयकॉनिक दुर्गेश माने तर मिस आयकॉनिक इशा जांगीड हे विजेत ठरले. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुत्रसंचालन तोष्णा घुडे, दिव्या गणवीर, शेख मेहवीश, क्रिष्ण राठोड, मुक्ता पवार, विकास जाधव यांनी केले. दुसर्या दिवशी क्रीकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक व कर्मचारी असे एकूण १५ संघांनी सहभाग घेतला. त्यानंतर रनिंग, रिले, बॅडमिंटन, कॅरम, चेस, खो-खो, व्हॉलीबॉल या स्पर्धा घेण्यात आला. स्पर्धेच्या सुरूवातीला राज्यस्तरीय चॅम्पीयन श्रृती कालबांडे आणि पृथ्वीराज आडे यांनी मशाल परेड केली. माजी खा. डॉ. उल्हास पाटील आकाशात फुगे सोडून स्पर्धांना सुरूवात केली. यशस्वीतेसाठी समन्वयक मिनाव खुरेजाम, प्रा. प्रियंका जगताप, कॉलेट लोंढे, मानसी ढोबळे, सचिन पवार, साक्षी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.









