जळगाव – रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाइट, जळगाव यांच्या वतीने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हे शिबिर रेड रिबीन क्लबरेड क्रॉस सोसायटी एनएसएस युनिट, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. रक्तदान प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी डॉ.उल्हास पाटील रक्तपेढीचे तज्ञ डॉ. नितीन भारंबे, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. श्रद्धा उमाळे यांनी पार पाडली.हे शिबिर वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रक्ताची गरज भागवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. शिबिराला विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनी या जीवनदायी उपक्रमाचा अभिमान व्यक्त केला.गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग च्या आरोग्य व सामाजिक बांधिलकीला बळकटी देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. आयोजकांनी सर्व रक्तदाते आणि सहकार्य करणार्या संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.