जळगाव — गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आज राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. एन. एस. आर्वीकर (वैद्यकिय संचालक वमाजी अधिष्टाता डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव)हे होते. सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. ईश्वर जाधव (प्रशासकिय अधिकारी),रासेयो समन्वयक डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. एन. एस. आर्वीकर यांनी नेत्रदानाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत म्हटले की, नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवा प्रकाश मिळतो, त्यामुळे समाजातील प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा. नेत्रदान – करा आणि उजळवा कोणाचे तरी जीवन!नेत्रदान चळवळीला व्यापक पाठिंबा देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी,विद्यार्थी आणि उपस्थितांनी नेत्रदानाचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन द्वितीय वर्षाच्या करिष्मा नारखेडे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स) या विद्यार्थिनीने केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना साठी रासेयो समन्वयक डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.