जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एम.बी.ए व एम.सी.ए इंडक्शन प्रोग्राम २०२५-२६ संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. नीलिमा वारके, डॉ. चेतन सरोदे, प्रा. चारुशीला चौधरी यांची प्रमुख उपस्थीती होती.
डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यवस्थापन म्हणजे काय आणि व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली, विद्यार्थ्यांनी युवा वर्गाने कम्फर्ट झोन च्या बाहेर यावे, फक्त परीक्षेसाठी विषयाचा अभ्यास न करता त्याचे प्रॅक्टिकल माहिती सुद्धा असू द्या जेणेकरून हा अनुभव पुढील काळात नवीन संधी निर्माण करून देईल असे सांगितले. तर इतर मान्यवरांनी या क्षैत्रातील रोजगाराच्या संधी विषद केल्यात उपस्थितांचे स्वागत विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.