जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या वैद्यकीय सर्जिकल नर्सिंग विभागाच्या वतीने प्रथम वर्ष बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हेपेटायटिस बी लसीकरण व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात ९६ विद्यार्थ्यांना हेपेटायटिस बी लसीकरण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना हेपेटायटिस बी या गंभीर आजाराबाबत मार्गदर्शन करतांना त्याचे लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि लसीकरणाचे महत्त्व याविषयी सखोल माहिती देवून जनजागृती करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक माहिती देऊन वैद्यकीय क्षेत्रात सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय-सर्जिकल नर्सिंग विभागाने केले होते. मार्गदर्शनासाठी प्रा. सुमैया शेख, प्रा. प्रियांका गडेकर, प्रा. रोहिणी हरगे आणि प्रा. सचिन पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण प्रक्रियेची ओळख करून देत, त्याचे फायदे समजावून सांगितले.महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक काळजी घेण्याचा संदेश दिला. अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांना आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सजग बनत आहे.