जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी फॉउंडेशन मध्ये आज गुरूपौर्णिमेचा उत्साह दिसून आला. विविध संस्थामध्ये आज शिष्यांनी गुरूंचे पूजन केले.
डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके यांच्यासह प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ उमाकांत चौधरी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली व अध्यक्षीय भाषणातून गुरुंचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व गुरुजनांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गुरुपौर्णिमेचे महत्व उलगडून सांगितले.?
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरीजळगाव (प्रतिनिधी) — गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत कविता, गीते आणि भाषणांचे सादरीकरण केले. प्राचार्या सौ. विशाखा गणवीर यांनी गुरूंच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होती.