जळगाव- गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलेगेंझा 2024 म्युझिक कन्सर्टला जल्लोषात सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक, मिस एशिया मृणाली चित्ते,गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष चेअरमन डॉ उल्हास पाटील, सदस्य डॉ अनिकेत पाटील, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ प्रशांत वारके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी अनिल खर्चे, अलका खर्चे, भुसावळ स्कुलच्या प्राचार्या अनघा पाटील, सावदा स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन कु. कृतिका आदी मान्यवर उपस्थित होते. स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक यांनी सांगितले कि, मी खुप भारावुन गेलो. हा माझा मोठा सन्मान समजतो मला इथे निमंत्रित केले. तुम्हि मला उपकृत केल्याचे गौरवोद्गार प्रमुख पाहुणे सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक यांनी व्यक्त केले. ध्येय धरल्यास आकाशहि ठेंगणे होते असेहि महाडिक म्हणाले. यावेळी डॉ. अनिकेत पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, गोदावरी शाळेला २५ वर्ष पुर्ण झाले आहे. २४ तास गोदावरी स्कुलचे शिक्षक समर्पण वृत्तीने काम करतात. गोदावरी स्कुलची प्रतिष्ठा जपण्याचे कार्य शाळेच्या प्राचार्या आणि प्रत्येक सदस्यानी प्रामाणिकपणे केले असल्याचे त्यांनी सांगितले.