या कार्यक्रमात प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. प्रियदर्शनी मून, प्रा. पियुष वाघ व डॉ. केतकी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांची विशेष उपस्थिती होती. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भाषण, कविता व गीत सादर केली.
बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचे स्मरण करत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थ्यांनी उत्साहाने केले व संपूर्ण परिसरात जयंतीचा प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
जय भीम!