जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. महाविद्यालयाचे प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा.ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), महाविद्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. नकुल गाडगे यांनी मनोगते व्यक्त केले. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले.
डॉ. उल्हास पाटील कृषी, अन्न तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय
डॉ. उल्हास पाटील कृषी,अन्न तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद्र सपकाळे तर अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. करण बनसोडे यांनी केले.
![](https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/Varicose-Advt.jpg)
![](https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240527-WA0012-1.jpg)