तायक्वांदो व कराटे स्पर्धांसाठी दोन विद्यार्थिनींची विद्यापीठ संघात निवड
जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी एस.एस.व्ही.पी.एस., धुळे येथे तायक्वांदो, कराटे व वूशू या खेळांच्या विभागीय स्तरावरील निवड चाचण्या पार पडल्या. या स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.या निवड चाचणीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत बाटु विदयापिठाच्या संघात स्थान मिळवले आहे. यामध्ये कु. पूर्वा नारायण चौधरी (तृतीय वर्ष -एआयडीएस) हिची तायक्वांदो या खेळासाठी निवड झाली आहे. ती दि. १६ ते २० मार्च २०२६ दरम्यान फकीर मोहन विदयापिठ येथे आयोजित अखिल भारतीय विद्यापीठस्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच कु. काजल कैलास सोनवणे (तृतीय वर्ष -एआयडीएस) हिची कराटे या खेळासाठी निवड झाली असून ती दि. १७ ते २१ मार्च २०२६ दरम्यान संजीव अक्ष्रवाल ग्लोबल एज्युकेशन विदयापिठ येथे होणार्या दक्षिण-पूर्व झोनल विद्यापीठस्तरीय कराटे स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.दोन्ही विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, विभागप्रमुख तसेच शिक्षकवृंद याचेसह गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनीही विद्यार्थिनींचे कौतुक केले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे.