यांत्रिकी विभागातून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांमधून गणेश चव्हाण (८०.१३%) प्रथम व नयन महाजन (७९.४७%) हा द्वितीय आणि मोहित पाटील (७४%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच द्वितीय वर्ष यांत्रिकी मधून प्रणव पाटील (७५%) प्रथम व अमोल सोनार (७०.२५%) द्वितीय आणि निखिल काथार (६८.२५%)तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत व तृतीय वर्ष यांत्रिकी मधून सत्यम चौधरी (८०%) प्रथम तर यश पाटील (७५%) द्वितीय व ध्रुवराज बाविस्कर (७४.२१%) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. संगणक विभागातून प्रथम वर्षातून सिमरन कोळी ( ८५.८८%) प्रथम व केतकी टिकले (८४.३८% ) द्वितीय आणि तोशिका चौधरी (८३.७५ %)गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. द्वितीय वर्ष संगणक विभागातून मृगेश पाटील (८५.४७ %) प्रथम तर वंश पाटील (८३.८७% ) द्वितीय व समय सदानी (८३.७३%) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. विद्युत विभागातून प्रथम वर्षातून ग्रीष्मा पाटील( ७५ %) गुण घेऊन प्रथम तर द्वितीय वर्षातून खगेश्वर नारखेडे (७६.९३ %) प्रथम व महेश नारखेडे (७५.८७%) द्वितीय आणि गायत्री कोळी (७४%) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. तृतीय वर्षातून करिष्मा तांबट (७८.५०%) गुण घेऊन प्रथम तर युगल रडे (७८.११%) गुण घेऊन द्वितीय व कुंदा फिरके (७७.५० %) गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ.केतकी पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा. दीपक.के.झांबरे तसेच यांत्रिकी विभागातील विभाग प्रमुख प्रा. कैलास माखिजा, विद्युत विभागातील विद्युत विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते व संगणक विभागातील विभाग प्रमुख प्रा. शिरीन पिंजारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या.