जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल जळगाव येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील तसेच सदस्य व हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील, महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉ. सिद्धेश्वर उपस्थित होते. सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलन, क्रीडा ध्वज व क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यानंतर ग्रीन, ब्ल्यू, येल्लो व रेड हाऊसच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी आय लव स्पोर्टस या संकल्पनेवर आधारित फॉर्मेशन डान्स, कराटे प्रात्यक्षिक सादर केले. याप्रसंगी रस्सीखेच स्पर्धाही घेण्यात आली विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सक्रिय सहभाग घेऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले. खेळातून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.या क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी, गोळाफेक, क्रिकेट, बुद्धिबळ आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्कूलच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.