जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात मंगळवार दिनांक १३ जूनपासुन उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महाशस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तज्ञांद्वारे केल्या जाणार आहे. त्याकरीता नावनोंदणी सुरु झाली असून आपणही अभियानात सहभागी होऊन आजारमुक्त व्हावे असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केले.
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे बिद्रवाक्य जोपासण्याचा नेहमीच डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयाचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने येत्या १३ जून ते २३ जून २०२३ या कालावधीत शस्त्रक्रिया अभियान राबविले जाणार आहे. या अभियान सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. यामध्ये स्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यात कॅन्सर, मेंदू, मूत्ररोग, अस्थिरोग, मणकेविकार, कान नाक घसा, जनरल सर्जरी इत्यादी केल्या जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयात १२५ हून अधिक डॉक्टरांची टिम असून प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफ तसेच अतिदक्षता विभागही येथे आहे. अधिक माहितीसाठी निवासी डॉ.कश्यप यांच्याशी ८३७९९७१५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
आधार व रेशन कार्ड आवश्यक
अभियानाचा लाभ घेण्यासाठी येतांना सोबत ओरिजीनल आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे, जेणेकरुन महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा रुग्णांना लाभ दिला जाणार आहे.
छत एक, सुविधा अनेक
रुग्णालयाचे छत एकच असून विविध दालनांमध्ये अनेक सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यात पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, ब्लड बँक, सुसज्ज अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह आदिंचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णांची धावपळ होणार नसून वेळेतच उपचार होतील.