जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान रॅगिंग प्रतिबंधक आठवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
महाविद्यालयात रॅगिंग होऊच नये यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याची गरज असून सर्व विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगच्या परिणामाबाबत जागृकता निर्माण करण्यात आली. रॅगिंग दंडनीय अपराध असल्याने हा अपराध होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासन तसेच विद्यार्थ्यांनीही जागृक असणे गरजेचे आहे. हे महत्व या आठवड्यात विविध उपक्रमांद्वारे पटविण्यात आले.
यामध्ये रॅगिंग प्रतिबंध संदर्भात ओरिएंटेशन प्रोग्रॅम, स्पर्धा, घोषवाक्य, निबंध लेखन, पोस्टर प्रदर्शन, वर्कशॉप, सेमिनार आदि उपक्रमांचा समावेश होता. या आठवड्याच्या अंतिम दिवशी शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधाबाबत शॉर्ट फिल्म व डॉक्युमेंट्री व्हिडीओ दाखविण्यात आला. या आठवड्यातील सर्वच उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ३०० ते ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.