

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी नर्सिंग अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. झेंडावंदनाप्रसंगी राष्ट्रीगीत ही म्हणण्यात आले. यानंतर डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य सेनानींनी केलेली उल्लेखनीय कामगिरी सांगून नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे व नर्सेसचे समाजसेवेसाठी, रुग्णसेवेसाठी चे योगदान समजावून सांगितले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम ही उत्साहात झाले असून देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. उपस्थीतांनी टाळ्यांच्या कडकडाटाने सादरीकरणाला दाद दिली. यावेळी व्हिडीओ मेकिंग कॉम्पिटिशन मध्येही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलिा. त्यात बीएस्सी नर्सिंग तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले.