जळगाव — गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात बीसीए च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित फेअरवेल पार्टी उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके तसेच डॉ. वर्षा पाटील इन्स्टीटयुट ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशच्या संचालीका डॉ निलीमा वारके उपस्थीत होत्या. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आपल्या भाषणात तीन वर्ष तुम्ही विद्यार्थी जे इथे शिकत राहिले ते खूप आठवणीत राहील तसेच पुढच्या शिक्षणासाठी आणि कॉर्पोरेट जॉब साठी शुभेच्छा दिल्यात.गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथे नुकतीच फेयरवेल पार्टी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन आणि विनोदी सादरीकरणांद्वारे आपले कौशल्य सादर केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षक व सहपाठींना भावनिक निरोप दिला.कार्यक्रमाच्या शेवटी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी प्रोत्साहन दिले. फेयरवेल पार्टीमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांशी आपले अनुभव शेअर केले आणि कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास विठू रुक्माई ची खास अशी मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली.यावेळी विविध गेम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये पेपर फॉल्ड, सारी ड्रेस अप, गेस द कलर इ समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समरीन व प्रेम नाले यांनी केले , कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन मनस्वी परदेशी, राहुल सोनवणे यांनी केले.