जळगाव — गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनजमेंट अँड रिसर्च,जळगाव येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट पदग्रहण सोहळा २०२४-२०२५ पार पडला. या वेळी रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटचे अध्यक्ष ओम प्रकाश सिंग,सचिव संजय तापडिया, गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनजमेंट अँड रिसर्च जळगांवचे संचालक रो. डॉ. प्रशांत वारके, गोदावरी कॉलेज इंजिनीरिंग चे प्राचार्य विजयकुमार पाटील, रोट्रॅकटर मोहित शामनांनी, तसेच विध्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. कर्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिट चे नवीन अध्यक्ष रोट्रॅकटर भूमिका नले आणि सचिव निधी पाटील यांना वर्ष २०२४-२०२५ चा कार्यभार सोपविण्यात आला तसेच नवीन एकूण ४३ रोट्रॅक सदस्य नोंदविण्यात आले. रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटचे नृतन अध्यक्ष रोट्रॅकटर भूमिका नले हिने येणार्या २०२४-२०२५ वर्षाचे कार्यक्रमाचे नियोजन सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटेरियन ओम प्रकाश सिंग यांनी विध्यार्थ्यांना रोट्रॅक क्लब मध्ये उत्साह आणि समाजाचे आपण देणे लागतो याहेतूने सतत कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात. शेवटी रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटचे समन्वयक प्रो प्राजक्ता पाटील आणि प्रज्ञा बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन केले तसेच रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटची सचिव निधी पाटील यांनी आभार मानले.