जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियाांत्रिकी महाविद्यालय जळगावच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या व्दीतीय वर्षाच्या ४० विद्यार्थांनी कॉपर ट्रॅक इंडस्ट्री नाशिक येथे औद्योगिक भेट दौरा केला.या औद्योजगक भेटीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व कॉपर ट्रॅक इंडस्ट्रीत सामजस्य करार करण्यात आला आहे.
या कराराअंतर्गत पीसीबी निर्मीती, कॉपर ट्रॅक डिझाइन तसेच विविध औद्योगिक विभागांचे प्रत्यक्ष प्रभिक्षण कंपनीतर्फे गोदावरीच्या विदयार्थ्यांना दिले जाणार आहे.ही भेट प्रा. आर. व्ही. पाट्ील व प्रा. एम. एन. पाट्ील यांच्या मार्गदनाखाली आयोजित करण्यात आली. उद्योगातील तज्ञांनी यावेळी सर्कीट डिझाईन पासून पीसीबी टेस्टींग पर्यंतची विदयार्थ्यांना दिली.तसेच शंकाचे निरसन केले.या औद्योगिक भेटीमूळे विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर तर पडलीच पण सामजस्य करारामूळे भविष्यात प्रशिक्षकण कार्यशाळा व प्रकल्प सहकार्याच्या दृष्टीने उपयुक्तता सिध्द होणार असल्याचे मत प्राचार्य व्ही एच पाटील यांनी व्यक्त केले.










