जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे ६ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान मानसिक आरोग्य जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम मानसिक आरोग्य विभागामार्फत जागतिक मानसिक आरोग्य दिना निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा उद्देश समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे व त्यासंबंधी असलेला कलंक दूर करणे हा होता.संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गेस्ट लेक्चर, मेंटल स्टेटस एक्झामिनेशनचे प्रात्यक्षिक, भूमिका सादरीकरण, रांगोळी स्पर्धा, रील व पोस्टर स्पर्धा, कविता आणि घोषवाक्य स्पर्धा यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानसिक आरोग्य विभागातील सर्व शिक्षकवृंद आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.कार्यक्रमादरम्यान मानसिक आरोग्याचे महत्त्व, तणाव व्यवस्थापन, तसेच मानसिक आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थी व समाज यांच्यात सकारात्मक मानसिक आरोग्याची जाणीव वाढविण्याचे प्रयत्न पुढेही सुरू ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.